गेल्या 40 वर्षांपासून साहित्यायन संस्था बागलाण तालुक्यात साहित्य सेवेची धुरा मोठ्या नेटाने वाहत आहे.
गेल्या चार दशकापासून साहित्यात संस्था साहित्य सेवेचे काम करीत आहे
प्रथम साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य कुसुमाग्रज
साहित्यायन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
साहित्यायन संस्थे द्वारा दरवर्षी साहित्य संमेलन आयोजित केले जाते
‘साहित्यायन’ संस्था गेली 40 वर्ष अखंडपणे साहित्य व सांस्कृतिविषयक उपक्रम राबवत आहे आजवर संस्थेचे 27 एक दिवसीय साहित्य संमेलन झालीत. साहित्य अभिरुची असणाऱ्या प्रत्येकाला एक वैचारिक व्यासपीठ संस्था उपलब्ध करून देते.
मान्यवर लेखकांच्या जयंती, पुण्यस्मरण, पारितोषिकाच्या निमित्ताने त्या त्या लेखकांच्या लेखनाचा समग्र उहापोह करणे, पारितोषिक प्राप्त ग्रंथावर चर्चा करणे, व्याख्यानाचे आयोजन करणे, कवितावाचनाचे कार्यक्रम आयोजित करणे तसेच ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त व तुकाराम बीजेनिमित्त खास व्याख्यानांचे कार्यक्रम करणे, काही वाडमयीन वादविवादावर चर्चा करणे, वाडमयातील तसेच समीक्षेतील नव्या प्रवाहांना जाणुन घेणे इत्यादी कार्यक्रम इतकी वर्षे सातत्याने चालु आहेत.
साहित्यायन संस्थेद्वारा आयोजित काही ठळक उपक्रमांविषयी
साहित्यायन संस्था दरवर्षी नवोदित तसेच ज्येष्ठ कवींसाठी कवी संमेलना च्या माध्यमातून एक मंच उपलब्ध करून देत असते.
आजपर्यंत साहित्यायनच्या व्यासपीठावर ना. धो. महानोर, डॉ. आनंद यादव, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, वसंत बापट, शंकर वैद्य, विद्याधर गोखले, विजय कुवळेकर, वसंत कानेटकर, प्रवीण दवणे, शंकर सारडा, रामचंद्र देखणे, सदानंद मोरे, कुमार केतकर, अरुण साधू आदी मान्यवरांनी अध्यक्षस्थान भूषविले आहे.
साहित्यिकच नव्हे तर सामान्य नागरिकांसाठी देखील वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
गेल्या 25 वर्षांपासून ही संस्था बागलाण तालुक्यात साहित्य सेवेची धुरा मोठ्या नेटाने वाहत आहे. शारदेची पालखी वाहून नेण्यास हे काम अनेक रसिक मान्यवर करीत आहेत. या पालखीचे भोई होण्यात धन्यता मानणार्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, अशी ‘साहित्यायन’ परिवाराची अपेक्षा आहे.
संपर्क करा